Ad will apear here
Next
सिंहगड पब्लिक स्कूलला पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार


पुणे :
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या लोणावळा कॅम्पसमधील सिंहगड पब्लिक स्कूलला सामाजिक वनीकरण खात्याचा पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. २५० शाळांमधून या शाळेची पुरस्कारासाठी निवड झाली. पुरस्काराचे वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  २६ जानेवारी २०२० रोजी झाले.

प्रा. आशा पाटील व हनुमंत माळी यांच्यासोबत विद्यार्थिवर्गाने हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल बोलताना स्कूलचे प्राचार्य निर्मलकुमार मिश्रा यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि सिंहगड संस्था यांचे आभार मानले व ‘हा सन्मान म्हणजे आम्हा सर्वांचा आहे,’ असे असे मनोगत व्यक्त केले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रो. नवले सर व संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष रोहित नवले व रचना नवले-अष्टेकर यांनी अभिनंदन केले. सिंहगड संस्थेच्या लोणावळा संकुलामधील सर्व प्राचार्य मंडळींनी व संकुल संचालक प्रा. डॉ. एम. एस. गायकवाड यांनी प्रा. मिश्रा व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZHYCI
Similar Posts
लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन; चांगला प्रतिसाद लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सिबाका महाविद्यालय आणि एन. बी. नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विकास इनामदार (संचालक, सिबाका) व डॉ. जयवंत देसाई (प्राचार्य, एन. बी. नवले कॉलेज) यांच्या हस्ते १५ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या लोणावळा संकुलात प्रदर्शनाचे उद्घाटन झाले
गोळाफेक स्पर्धेत ‘सूर्यदत्ता’च्या सावरी शिंदेला रौप्यपदक पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींसाठीच्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या सावरी शिंदे हिने रौप्यपदक जिंकले. आता ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. १३.१२ मीटरचा पल्ला गाठून तिने हे यश संपादन केले
‘सावित्री’च्या लेकी... टेक्नोसॅव्ही पुणे : एक जानेवारी १८४८ रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे एक जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो. तीन जानेवारी २०२० रोजी सावित्रीबाईंची १८९वी जयंती आहे. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून
‘संगीत आणि नृत्याविष्कारामुळे जीवन सुसह्य होते’ पुणे : ‘पृथ्वीवर केवळ मानवप्राणी हा एकमेव आहे, ज्याला ईश्वराकडून कलेची देणगी मिळालेली आहे. संगीत आणि नृत्याविष्कारामुळे आपले जीवन सुसह्य झाले आहे,’ असे मत ज्येष्ठ नृत्यगुरू आणि भरतनाट्यम नृत्य कलाकार सुचेता भिडे-चापेकर यांनी व्यक्त केले. लायन्स क्लबतर्फे आयोजित कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठीच्या समूहनृत्य

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language